
‘इलेक्ट्रोपॅथी डॉक्टरांना बोगस डॉक्टर संबोधू नये’
पुणे, ता. १३ ः राज्य शासनाने अथवा प्रशासनाने इलेक्ट्रोपॅथी किंवा इलेक्ट्रोहोमिओ चिकित्सा उपचार करणाऱ्यांना व्यवसाय परवाना द्यावा. त्यांना आयुष्य डॉक्टर असे संबोधावे. त्यांना त्यांच्या चिकित्सालयात इलेक्ट्रो होमिओपॅथी औषधोपचार पद्धतीने उपचार करत असताना तो बोगस डॉक्टर या सदरात येत नाही, असा स्पष्ट आदेश परिपत्रकाद्वारे निर्गमित करावा. अशा मागण्यांचे निवेदन समस्त महाराष्ट्र इलेक्ट्रो-होमियोपॅथी संयुक्त समितीतर्फे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना पुण्यात निवेदन दिले.
महाराष्ट्रातील एकूण सात इलेक्ट्रोहोमिओपॅथी संघटना व जुनी संघटना मेपा यांनी एकत्र येऊन इलेक्ट्रोहोमिओपॅथी संयुक्त समिती स्थापन केली आहे. यावेळी संघटनेचे धर्मेंद्र शहा, सुनीता कुंदूर, रत्नप्रभा जाधव, मल्लेश गजेंगी उपस्थित होते. केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सर्वोच्च न्यायालयाने २२ जानेवारी २०१५ रोजी इलेक्ट्रोहोमिओपॅथी अर्हताधारकांना इलेक्ट्रोपॅथी किंवा इलेक्ट्रोहोमिओपॅथी या औषधोपचार पद्धतीने वैद्यकीय व्यवसाय करण्यास प्रतिबंध नाही, असा आदेश दिला आहे, असे असताना महाराष्ट्र राज्यात इलेक्ट्रोहोमिओपॅथी व्यावसायिकांना अनेक प्रशासकीय समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, असे मत शहा यांनी मांडले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63164 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..