बुलेटच्या धडकेत जखमी झालेल्या सहप्रवाशाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुलेटच्या धडकेत जखमी झालेल्या सहप्रवाशाचा मृत्यू
बुलेटच्या धडकेत जखमी झालेल्या सहप्रवाशाचा मृत्यू

बुलेटच्या धडकेत जखमी झालेल्या सहप्रवाशाचा मृत्यू

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः भरधाव बुलेटने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. तर दुचाकीवर बसलेला सहप्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घोरपडी परिसरात घडली. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौतम विश्वजित शामल (वय ४०, रा. केदारीनगर, वानवडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर हिरामण जगन्नाथ राम (वय ४४, रा. मरिमाता नगर, घोरपडी गाव) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी सौदागर माने यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरामण राम व त्यांचे सहप्रवासी गौतम शामल हे दोघेजण घोरपडीतील आर्मी पब्लिक स्कूलच्या पाठीमागील बाजूच्या अलेक्‍झांडर रस्त्याने जात होते. त्यावेळी अनोळखी व्यक्तीच्या भरधाव बुलेटने राम यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. अपघातात दुचाकी खाली पडून शामल व राम हे दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र शामल यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस.एस.केंजळे करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63181 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top