घरफोडी, मोबाईल चोरीच्या घटनांचे सत्र सुरुच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोडी, मोबाईल चोरीच्या घटनांचे सत्र सुरुच
घरफोडी, मोबाईल चोरीच्या घटनांचे सत्र सुरुच

घरफोडी, मोबाईल चोरीच्या घटनांचे सत्र सुरुच

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः शहराच्या वेगवेगळ्या भागात नागरिकांकडील मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेण्याच्या घटना थांबण्याची चिन्हे नाहीत. सोमवार पेठेत पायी जाणाऱ्या तरुणीचा, तर वाघोली येथे दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाचा मोबाईल चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. याप्रकरणी लोणीकंद व समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वडगाव येथे झालेल्या घरफोडीत साडे चार लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला.

सोमवार पेठेत घडलेल्या घटनेप्रकरणी १९ वर्षीय तरुणीने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी जुन्या जिल्हा परिषदेसमोरील बस थांब्यासमोरुन पायी जात होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी तरुणीच्या हातातील पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप जोरे करीत आहेत.

वाघोली येथे घडलेल्या घटनेबाबत संकेत पवार (वय २१, रा. आव्हाळवाडी, हवेली) याने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुण दुचाकीवरून वाघोली येथील घरी जात होता. त्याची दुचाकी पंचशील टॉवर येथे आली. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या खिशातील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सूरज गोरे करीत आहेत.

दरम्यान, वडगाव येथे घरफोडीची घटना घडली.याप्रकरणी संजय पवार (वय ४२) यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पवार यांचे वडगाव येथील निवारा अपार्टमेंटमध्ये सदनिका आहे. बुधवारी रात्री फिर्यादी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी घराचे कुलूप कशाच्या तरी साहाय्याने तोडून बेडरुममध्ये प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादीच्या कपाटातील एक लाख ८५ हजार रुपयांची रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा चार लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. या प्रकरणाचा तपास महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63188 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top