बांबूची लागवड करून तापमान नियंत्रित करावे ः पाशा पटेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांबूची लागवड करून तापमान नियंत्रित करावे ः पाशा पटेल
बांबूची लागवड करून तापमान नियंत्रित करावे ः पाशा पटेल

बांबूची लागवड करून तापमान नियंत्रित करावे ः पाशा पटेल

sakal_logo
By

पुणे,ता. १३ ःदेशातील सर्व नद्यांच्या किनाऱ्याला बांबूची लागवड करून तापमानाला नियंत्रित करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीच्या सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च अंतर्गत आयोजित ‘पुणे सिटिझन्स क्लायमेट मॅनिफेस्टो’ या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ‘‘वाढत्या तापमानामुळे भविष्यात जवळपास ४० टक्के शेतीचे उत्पादन, मासे आणि दूध कमी होईल. पण वाढत जाणाऱ्या जनसंख्येला काय परिणाम भोगावे लागतील याची कल्पना करणे ही अवघड आहे, ’’असे पटेल म्हणाले. यावेळी माजी मुख्य ,निवडणुक आयुक्त ओम प्रकाश रावत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुणे विभागाचे वन संरक्षक अधिकारी राहुल पाटील हे अतिथि म्हणून उपस्थित होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, पुणे विद्यापीठाच्या भुगोल विभागाचे प्रमुख डॉ. सुधाकर परदेशी व सिडॅकच्या डॉ. अक्षरा कागीनाळकर उपस्थित होते. डॉ. अनुराधा पै यांनी सूत्रसंचालन केले. स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीच्या डीन डॉ. शालिनी शर्मा यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63193 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top