किडनी प्रत्यारोपणप्रकरणी दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किडनी प्रत्यारोपणप्रकरणी दोघांना अटक
किडनी प्रत्यारोपणप्रकरणी दोघांना अटक

किडनी प्रत्यारोपणप्रकरणी दोघांना अटक

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : रूबी हॉल क्लिनिकमधील किडनी प्रत्यारोपण प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हे दोघेही एजंट आहेत. अभिजित शशिकांत गटणे (वय ४०, रा. एरंडवणे गावठाण) आणि रवींद्र महादेव रोडगे (वय ४३, रा. लांडेवाडी, पिंपरी-चिंचवड) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. एस. पाटील यांच्या न्यायालयाने आरोपींना १८ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. किडनी प्रत्योरापण प्रकरणात किडनी दान करणारी महिला व किडनीची आवश्यकता असलेला पुरुष हे पती-पत्नी असल्याचे दाखविण्यासाठी आरोपींनी लग्नाचे बनावट छायाचित्र, आधार व मतदार ओळखपत्र तयार केल्याची माहिती सहाय्यक सरकारी वकील दिलीप गायकवाड यांनी न्यायालयाला दिली.

याबाबत, आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम (वय ५९, रा. शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. किडनी प्रत्यारोपणासाठी अमित व सुजाता साळुंखे दाम्पत्याने एजंट रवींद्र रोडगे आणि अभिजित गटणे यांच्या मदतीने कट रचला. त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून रूबी हॉल येथे सादर केली. तर, अन्य आरोपींनी कागदपत्रांची खात्री न करता कागदपत्रे रिजनल ऑथोरायजेशन कमिटीकडे (ससून) पाठवून दिशाभूल केली. त्यांनी मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी अटक आरोपींसह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास कोरेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक वेताळ करीत आहेत.

१८ मेपर्यंत पोलिस कोठडी

या प्रकरणी गटणे व रोडगे याला अटक करत शुक्रवारी (ता. १३) न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपींनी अमित साळुंखे व किडनी देणाऱ्या या महिलेस कोणाच्या मदतीने संपर्क साधला, महिलेला किडनी देण्यासाठी किती पैसे देण्याचे कबूल केले होते तसेच तिला किती पैसे दिले, यासह गुन्ह्याचा अधिक तपास करायचा असल्याने पोलिस कोठडीची मागणी अ‍ॅड. गायकवाड यांनी केली. न्यायालयाने आरोपींना १८ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63234 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top