घोरपडे घाटावर स्वच्छता मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोरपडे घाटावर स्वच्छता मोहीम
घोरपडे घाटावर स्वच्छता मोहीम

घोरपडे घाटावर स्वच्छता मोहीम

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः मुठा नदीपात्रातील ऐतिहासिक घोरपडे घाटावर स्वच्छता मोहीम नुकतीच राबवण्यात आली. श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठानने या घाटाचे रूप पालटले आहे. एकेकाळी वैभवाची साक्ष देणारे हे घोरपडे घाट दुर्लक्षित झाले होते. ही बाब लक्षात घेत या वास्तूची स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान, पुणे महापालिका व स्वराज्य भूमी प्रतिष्ठान यांनी पुढाकार घेतला.
जागतिक मातृदिन साजरा करत असताना हे स्वच्छता अभियान राबविले. या अभियानाचे नेतृत्व अनुराधा घोरपडे यांनी केले. या मोहिमेला प्रतिष्ठानचे सर्व सभासद, इतर संघटना, शिवप्रेमी संघटना तसेच घोरपडे परिवारातील सदस्यांचा प्रतिसाद मिळाला. या मोहिमेत जीवन कवडे, प्रतापगड उत्सव समितीचे संजय भोसले, लालमहाल उत्सव समितीचे प्रशांत किराड, जिजामाता उत्सव समितीच्या प्रीती शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महेश काळे, सुनील चिकणे, अभिजित घोरपडे आदींनी सहभाग घेतला होता. या मोहिमेनंतर आणखीन दोन मोहिमा लवकरच राबविण्यात येणार असून. हा घाट पूर्णपणे स्वच्छ करण्यात येईल, अशी माहिती प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63257 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top