
‘पुणे दर्शन’मधून ‘फुले वाडा’ वगळला
पुणे, ता. १३ ः ‘पुणे दर्शन’मधून महात्मा फुले वाडा वगळण्यात आला आहे. पीएमपीने तत्काळ पुणे दर्शन बस मार्गामध्ये महात्मा फुले वाड्याचा समावेश करावा,
अशी मागणी महात्मा फुले मंडळाने केली असून आम आदमी पक्षाने त्याला पाठिंबा दिला आहे.
महात्मा फुले वाडा हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित झाले आहे. फुले वाडा पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे. देशभरातून अनेक लोक फुले वाड्याला भेट द्यायला येतात. फुले वाडा हा पुण्याचा सांस्कृतिक, शैक्षणिक ठेवा आहेच, शिवाय संपूर्ण राष्ट्राला अभिमान वाटावा असे प्रेरणास्थळ आहे. असे असतानाही ‘पुणे दर्शन’ या बस सेवेमधून फुले वाड्याला वगळण्यात आले आहे. हे करताना पीएमपी दिलेली कारणे न पटण्यासारखी आहेत. फुले वाड्याच्या नजीकच अग्निशामन केंद्राचे पुणे शहरातील मुख्य कार्यालय आहे. त्या ठिकाणी अग्निशमन वाहने मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात.अशा वेळी फुले वाड्याजवळ जायला अपुरा रस्ता आहे, ही सबब योग्य नाही. फुले वाड्याच्या रस्त्यावर जर काही अतिक्रमणे असतील तर त्याबाबत महानगरपालिकेने कारवाई करून फुले वाडा पर्यंतचा रस्ता प्रशस्त केला पाहिजे. ‘पुणे दर्शन’मध्ये फुलेवाड्याचा समावेश झाला पाहिजे, या महात्मा फुले मंडळाच्या मागणीला आम आदमी पक्षाचा पाठिंबा दिला आहे.
‘पुणे दर्शन’मधून महात्मा फुले वाडा वगळण्यात आलेला नाही. तेथील अरुंद रस्त्यांमुळे बसला वाड्या जवळ जाता येत नाही. त्यामुळे पुणे दर्शन ही बस वाड्या पासून काही अंतरावर थांबते.ज्या प्रवाशांना दर्शन घ्यायचे असते ते तिथे जातात.
-राजेश रूपनवर, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल, पुणे.
.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63258 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..