बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक करणाऱ्यास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक करणाऱ्यास अटक
बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक करणाऱ्यास अटक

बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक करणाऱ्यास अटक

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : आर्थिक फायद्याच्या गैरहेतूने बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकास अटक केली. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत (ता. १६) पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील दिलीप व्ही. गायकवाड यांनी केली. कल्पेश रमेश बोहरा (वय ४२, रा. बुलडाणा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. खंडणीविरोधी पथकाचे पोलिस फौजदार मधुकर ज्ञानदेव तुपसुंदर यांनी याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी बोहरा हा प्रॉपर्टी एजंट आहे. त्याने निवडणूक आयोगाचे बनावट ओळखपत्र सादर करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63260 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top