उन्हाच्या झळांपासून काहीशी सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उन्हाच्या झळांपासून काहीशी सुटका
उन्हाच्या झळांपासून काहीशी सुटका

उन्हाच्या झळांपासून काहीशी सुटका

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः ढगाळ वातावरणामुळे सध्या पुणे शहर आणि परिसरात उन्हाचा कडाका कमी झाला आहे. शहरात कमाल तापमानाचा पारा सातत्याने घसरू लागला असून उन्हाच्या झळांपासून पुणेकरांची काहीशी सुटका झाली आहे. हे चित्र पुढील दोन ते तीन दिवस असेच कायम राहणार आहे.
पुणे शहरात शुक्रवारी (ता. १३) ३६.७ अंश कमाल आणि २५.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. कमाल तापमानात होत असलेली घट यामुळे घराबाहेर पडताना उन्हाचा त्रास कमी झाला आहे. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या सोमवारपर्यंत (ता. १६) शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण कायम राहणार असून कमाल तापमान हे ३७ ते ३८ अंशांदरम्यान असेल. त्यानंतर मात्र जिल्ह्यात काही ठिकाणी पारा पुन्हा ४० अंशांवर पोचण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात आलेल्या असानी या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ढगाळ वातावरणासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी कमाल तापमानात घट पाहायला मिळत आहे. असे असले तरी विदर्भात मात्र उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. राज्यात शुक्रवारी तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४४.७ अंश सेल्सिअस तर महाबळेश्‍वर येथे नीचांकी तापमान १८.८ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. शनिवारी (ता. १४) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते. विदर्भात सध्या पारा ४३ अंशांच्या पुढे कायम आहे. बुलडाणा, वर्धा, अमरावती येथे पारा ४४ अंशांच्या पुढे आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा सरासरीच्या खाली घसरला आहे. मात्र मराठवाडा आणि विदर्भात उन्हाचा ताप कायम आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63273 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top