
धर्मादाय सहआयुक्तालय करणार ‘रुबी’ची चौकशी
पुणे, ता. १३ : किडनी प्रत्यारोपण प्रकरणी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यापाठोपाठ आता पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाने रूबी हॉल क्लिनिकच्या चौकशीचे आदेश शुक्रवारी दिले. या प्रकरणी पुढील दहा दिवसांमध्ये चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश धर्मादाय सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी दिले आहेत.
किडनी प्रत्यारोपण प्रकरणामध्ये रूबी हॉल क्लिनिकसह पंधरा जणांवर सार्वजनिक आरोग्य खात्याने गुरुवारी गुन्हा नोंदला. त्या पार्श्वभूमिवर हे आदेश देण्यात आले आहेत. निरीक्षक कैलास महाले हे या प्रकरणी चौकशी करणार आहेत. त्या बाबतचा अहवाल पुढील दहा दिवसांमध्ये सादर करावा, असेही या आदेशात नमूद केले आहे.
रूबी हॉल क्लिनिक हे धर्मादाय न्यासांतर्गत नोंदणी झालेले रुग्णालय आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची दखल घेण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत.
बुक्के म्हणाले, संबंधित चौकशी अधिकारी रुग्णालयातील अकाउंट, रेकॉर्ड याची तपासणी करेल.”
अवयव विक्री करण्याची वेळ येऊ नये ः टोपे
रूबी हॉल क्लिनिकमध्ये मोठ्या प्रमाणात अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होत आहेत. त्या पूर्णतः बंद करणे हा देखिल पुढच्या लोकांच्या दृष्टीने अन्यायाचा विषय होऊ शकतो. मात्र, कोणत्याही परिस्थिती अशा घटना भविष्यात घडता कामा नये, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. आर्थिक गरज भागविण्यासाठी नागरिकांना आपले अवयव विक्री करण्याची वेळ येऊ नये, ही मुख्य भूमिका घेऊन सध्याच्या व्यवस्थेत बदल करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना रूग्णसंख्येत मोठी वाढ नाही
राज्यात शंभर-सव्वाशेच्या संख्येने कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. ही वाढ खूप मोठी नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. रुग्णांची संख्या वाढत असली तरीही त्यातून रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत नाही. हा सौम्य स्वरूपाचा आजार दिसत आहे. घरात उपचार घेऊन रुग्ण बरे होत आहेत. पण, या प्रत्येक बदलावर बारकाईने लक्ष ठेऊन असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63288 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..