उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खरीप हंगामाची सोमवारी बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खरीप हंगामाची सोमवारी बैठक
उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खरीप हंगामाची सोमवारी बैठक

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खरीप हंगामाची सोमवारी बैठक

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : पुणे महसूल विभागांतर्गत सर्व जिल्ह्यांचा खरीप हंगाम-२०२२ च्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी (ता. १६) दुपारी साडेतीन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह विभागातील खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. खरीप हंगामात खते, बियाणे, कृषी निविष्ठांची आवश्यकता, मागणी, उपलब्धता तसेच पीककर्ज, वीज वितरण आणि सिंचन सद्यःस्थिती याबाबत आढावा घेतला जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63290 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top