
अपयश झाकण्यासाठी शरद पवार यांची बदनामी
पुणे, ता. १४ : देशात महागाई खूप वाढली आहे. त्यामुळे आलेले अपयश झाकण्यासाठी भाजपचे नेते जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बदनामी ट्विटरच्या माध्यमातून करू लागले आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी एका खासगी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
सामाजिक माध्यमांवर व्हायरल झालेला शरद पवार यांचा तो मूळ व्हिडिओ नसून भाजपच्याच एका नेत्याने कट-पेस्ट आणि एडिटिंग करून जाणीवपूर्वक चुकीचा आणि खोटा व्हिडिओ व्हायरल केला असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला.
ते म्हणाले, ‘‘शरद पवार हे एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व आहे. ते देश आणि जगाचे विश्व विद्यापीठ आहेत. धर्म हा काही कोणाही एकाचा नाही. पण भाजपने सध्या धर्माचा बाजार मांडला आहे. याच्या माध्यमातून दोन धर्मांतील वातावरण खराब करायचे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा, ही महागाईचे अपयश झाकण्यासाठी भाजपने केलेली खेळी आहे. महागाईचे अपयश झाकण्यासाठी भाजप कुठल्याही स्तराला पोहोचू शकतो, हे या व्हिडिओवरुन स्पष्ट झाले आहे.’’
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63293 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..