क्षण छायाचित्र प्रदर्शन उद्यापर्यंत खुले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्षण छायाचित्र प्रदर्शन उद्यापर्यंत खुले
क्षण छायाचित्र प्रदर्शन उद्यापर्यंत खुले

क्षण छायाचित्र प्रदर्शन उद्यापर्यंत खुले

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः स्टारविन्स ग्रुपतर्फे आयोजित क्षण छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात १६ मे पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ दरम्यान हे प्रदर्शन सर्वांसाठी असेल. यानिमित्ताने बनसोडे यांच्या हस्ते क्षण पुरस्कार सहेली संस्थेच्या तेजस्वी सेवेकरी, गिर्यारोहक स्मिता घुगे, पुणे फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष अभय काप्रे आणि रॅम्बो सर्कसचे संचालक सुजित दिलीप यांना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी विनायक रेणके, ग्रुपचे प्रणव तावरे, स्वरदा देवधर, मयूर बनसोडे उपस्थित होते. चरणराज लोखंडे यांनी प्रास्ताविक केले तर राज देशपांडे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63295 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top