पिंपरी महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर
पिंपरी महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

पिंपरी महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

sakal_logo
By

पिंपरी, ता.१३ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ प्रभागात किरकोळ फेरबदल करत प्रारूप आराखड्यास राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली. महापालिकेने एक फेब्रुवारीला आराखडा प्रसिद्ध केला होता. त्यावर तब्बल ५ हजार ६८४ हरकती व सूचना आल्या होत्या. त्यामुळे याबाबत निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याविषयी मोठी उत्सुकता होती. मात्र, आठ ठिकाणी किरकोळ काही भाग तोडून शेजारच्या प्रभागाला जोडण्यात आला आहे. साहजिकच काही प्रभागांच्या लोकसंख्येत थोडा बदल झाला आहे. हे किरकोळ बदल वगळता इतर कोणत्याही प्रभागात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे तीन सदस्यांचे ४५ व चार सदस्यांचा एक असे एकूण ४६ प्रभाग आणि १३९ नगरसेवक असणार हे निश्‍चित झाले असून पुन्हा निवडणूक वातावरण तयार झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63297 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top