
‘बालगंधर्व’साठी सर्वपक्षीय बैठक व्हावी
पुणे, ता. १३ ः बालगंधर्व रंगमंदिराच्या पुर्नविकासाचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व राजकीय पक्षांची एकत्रित बैठक घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस चित्रपट, कला, सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबा पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे शुक्रवारी केली.
बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकास हा पुणेकरांच्या भावनेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवा आराखडा निश्चित करण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक घेण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या कला-सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना बोलवावे, तसेच बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचे काम सुरू करण्यापूर्वी शहरातील काम सुरू असलेल्या तीन नाट्यगृहांचे सुरू असलेले काम पूर्ण करावे, तसेच महापालिकेच्या अन्य नाट्यगृहांच्या देखभाल दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे, बालगंधर्व रंगमंदिराचा नियोजितच आराखडा पुणेकरांसमोर सादर करावा आणि त्याच्या उभारणीचे वेळापत्रकही जाहीर करावे, अशी मागणी पाटील यांनी निवेदनात केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63298 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..