जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आज स्नेहमेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आज स्नेहमेळावा
जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आज स्नेहमेळावा

जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आज स्नेहमेळावा

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः पुणे जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्यावतीने जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा रविवारी (ता. १५) आयोजित केला आहे. हा स्नेहमेळावा जिल्हा परिषद मुख्यालयातील शरदचंद्र पवार सभागृहात होणार आहे. जिल्हा परिषद स्थापनेच्या हिरकमहोत्सवानिमित्त हा मेळावा आयोजित केला आहे. त्यामुळे या मेळाव्याला सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन या संघाचे अध्यक्ष पां. कृ. मर्ढेकर, खजिनदार विनायक बहिरट व सहसचिव वि. ल. पवार यांनी केले. रविवारी सकाळी १० वाजता होत असलेल्या या स्नेहमेळाव्यात वयाची ८० वर्षे पूर्ण करणारे आणि लग्नाची ५० वर्षे पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे आणि मुख्य वित्त व लेखा अधिकारी महेश अवताडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63305 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top