अंतिम प्रभाग रचना ः पुणे महापालिकेत राजकीय खेळी भाजपवर कुरघोडीचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंतिम प्रभाग रचना ः पुणे महापालिकेत राजकीय खेळी
भाजपवर कुरघोडीचा प्रयत्न
अंतिम प्रभाग रचना ः पुणे महापालिकेत राजकीय खेळी भाजपवर कुरघोडीचा प्रयत्न

अंतिम प्रभाग रचना ः पुणे महापालिकेत राजकीय खेळी भाजपवर कुरघोडीचा प्रयत्न

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १३ : आगामी महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेवरून महापालिकेतील भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला आहे. प्रभाग रचना अंतिम करताना भाजपचे बलस्थान असलेल्या प्रभागांमध्ये सर्वाधिक बदल झाल्याचे समोर आले आहे. तर कोथरूड, शिवाजीनगर, हडपसर, पर्वती आणि खडकवासला विधानसभा मतदार संघातील प्रभागांत प्रामुख्याने बदल झाल्याचे दिसून आले.
महापालिका निवडणुकीसाठीची बहुचर्चित अंतिम प्रभाग रचना शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर झाली आणि राजकीय वर्तुळात एकच धांदल उडाली. प्रारूप प्रभाग रचना आणि अंतिम प्रभाग रचनेत काय बदल झाले हे जाणून घेण्यासाठी इच्छुकांमध्ये कुतूहल निर्माण झाले. प्रभाग रचना अंतिम करताना आयोगाकडून लोकसंख्येत बदल करण्यात आल्याने बहुतांश प्रभागांच्या सीमांमध्ये बदल झाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने माजी महापौर मुरलीधर मोहोळ तसेच दीपक मानकर, पृथ्वीराज सुतार, आबा बागूल, सुभाष जगताप, वसंत मोरे, प्रशांत जगताप, आश्‍विनी कदम, चेतन तुपे, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, सुशिल मेंगडे, शंकर पवार, राजेंद्र शिळमकर, वर्षा तापकीर, बंडू केमसे, दीपक पोटे, निलीमा खाडे, प्रकाश ढोरे, परशुराम वाडेकर, राजू बराटे, बंडू गायकवाड, चंदू कदम यांच्यासह अनेक नगरसेवकांच्या प्रभागांच्या हद्दीत बदल झाले आहेत. लोकसंख्येनुसार ३२ प्रभागात बदल झाला असला, तरी प्रत्यक्षात १५ ते १६ प्रभागांच्या सीमांत मोठे बदल झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे प्राबल्य असलेल्या आठपैकी वडगाव शेरी, हडपसर आणि खडकवासला या तिन्ही मतदार संघाकडे लक्ष दिले असल्याचे समोर आले आहे. विशेषतः सर्वाधिक नगरसेवकांची संख्या असलेल्या वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात फारसे बदल करण्यात आलेले नाहीत. भाजपचे प्रमुख इच्छुक परस्परांच्या समोर कसे येतील, त्यातून गेल्या निवडणुकीत पक्षाला रामराम ठोकून भाजपच्या गोटात गेलेल्यांना पुन्हा परत कसे आणता येईल, याचा विचार या रचनेच्या माध्यमातून झाल्याची चर्चा आहे.

राजकीय उत्सुकता ताणली
महापालिकेच्या निवडणुकीत भाजप विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात महाविकास आघाडी होणार की नाही, याबाबत उलट-सुलट चर्चा आहे. काँग्रेसने पहिल्यापासूनच स्वबळाचा नारा दिला आहे. परंतु आता अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस आता काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळात उत्सुकता ताणली गेली आहे.

लोकसभा निवडणुकीचा विचार?
महापालिकेच्या निवडणुकांनंतर २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहे. त्याचा विचार देखील या प्रभाग रचनेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. परंपरागत पुणे शहर लोकसभा मतदार संघ हा भाजप आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसकडे आहे. २०१४ पासून पुणे शहरातील काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी राजकीय समीकरणे ठरण्यासाठी ही प्रभाग रचना महत्त्वाची ठरू शकते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63311 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top