विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांसाठी हक्काचे व्यासपीठ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांसाठी हक्काचे व्यासपीठ!
विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांसाठी हक्काचे व्यासपीठ!

विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांसाठी हक्काचे व्यासपीठ!

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांना आता ‘एसपीपीयू अल्युम्नाय असोसिएशन’द्वारे हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. त्या माध्यमातून आता माजी विद्यार्थ्यांचे विद्यापीठाशी असणारे नाते कायमस्वरूपी जोडले जाणार आहे. असोसिएशनच्या संकेतस्थळाचे उद्‌घाटन नुकतेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले.

या वेळी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, डॉ. संजय चाकणे, प्रसेनजित फडणवीस, असोसिएशनचे संचालक ॲड. एस. के. जैन, डॉ. संजय ढोले, असोसिएशनच्या सल्लागार समितीचे सदस्य कृष्णकुमार गोयल, डॉ. सुप्रिया पाटील, संपर्कप्रमुख म्हणून प्रतीक दामा आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. करमळकर म्हणाले, ‘‘हे संकेतस्थळामुळे देशविदेशात असणारे माजी विद्यार्थी विद्यापीठाशी कायमस्वरूपी जोडले जातील.’’ असोसिएशनची पुढील वाटचाल व नियोजन या बाबत ॲड. जैन आणि गोयल यांनी अनेक विषय सुचवले. या वेळी समन्वयक विक्रमादित्य राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63417 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top