''रामदास - कीर्ती स्मरणरंगा''त रंगलेली मैफल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''रामदास - कीर्ती स्मरणरंगा''त रंगलेली मैफल
''रामदास - कीर्ती स्मरणरंगा''त रंगलेली मैफल

''रामदास - कीर्ती स्मरणरंगा''त रंगलेली मैफल

sakal_logo
By

भरतनाट्य संशोधन मंदिराच्या तिसाव्या वासंतिक संगीत नाट्य महोत्सवाचा समारोप नुकताच ‘रामदास - कीर्ती स्मरणरंग’ या विशेष मैफलीने झाला. गायक-अभिनेते रामदास कामत व गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांना मानवंदना देण्यासाठी, त्यांच्या गीतांवर आधारित हा कार्यक्रम होता.
या महोत्सवात झालेल्या संगीत नाटकांपेक्षा इतर नाटकांतील पदे निवडल्यामुळे, दररोज हजेरी लावलेल्या रसिकांना पुनरुक्तीऐवजी वेगळ्या पदांचा आनंद घेता आला. दुसरे वैशिष्ट्य असे की, गायकांमध्ये जुन्या जाणत्यांबरोबर ताज्या दमाच्या कलाकारांना संधी दिली. तिसरे वैशिष्ट्य म्हणजे नाट्यपदांच्या जोडीला ‘वायुसंगे येई श्रावणा’ हे भावगीत व ‘प्रथम तुज पाहता’ या चित्रपटगीताचाही समावेश केला. त्यामुळे नाट्यगीत गायकांच्या बहुपेडी कारकीर्दीकडे लक्ष वेधले गेले.
संगीत नाटकांच्या प्रथेप्रमाणे नांदीने मैफिलीची सुरवात झाली. ‘विद्याहरण’ नाटकातील ‘सुखकर हे होवो मज,’ ही नांदी सर्व गायकांनी एकत्रितपणे गायली. नंतर श्रद्धा जोशीने ‘बलसागर तुम्ही वीर शिरोमणी’ हे भीमपलास रागातील पद सादर केले. निधी घारेने ‘अरे वेड्या मना तळमळसी’ या पदाने बहार आणली. हृषीकेश बडवे यांनी ‘जन विजन झाले’, हा अभंग खुल्या आवाजात आळवला. संपदा थिटे यांनी ‘मधुकर वन वन फिरत’ या पदातील भ्रमराचा गुंजारव स्वरावलींतून दाखवला. अर्णव पुजारीने ‘मी मानापमाना’ हे पद दमदारपणे सादर केले. बागेश्री रागावर आधारित ‘दान करी रे’ हे पद संजीव मेहेंदळे यांनी तब्येतीत सादर केले.
अनादी अनंते, पूर्वेच्या देवा, आली प्रणयचंद्रिका, शंकरा भरणमू, सर्वात्मका सर्वेश्वरा यांसारख्या गीतांनी उत्तरार्ध रंगत गेला. संजय गोगटे यांनी ऑर्गन तसेच पांडुरंग मुखडे व अभिजित जायदे यांनी तबल्यावर रंगतदार साथ केली. रवींद्र खरे यांनी निवेदनातून कामत व शिलेदार यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63418 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top