नीट, जेईईचे १५ हजार ओबीसी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नीट, जेईईचे १५ हजार ओबीसी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
नीट, जेईईचे १५ हजार ओबीसी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

नीट, जेईईचे १५ हजार ओबीसी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (महाज्योती) एमएच-सीईटी, जेईई, नीट या परीक्षांसाठी मोफत ऑनलाइन प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी ओबीसी, विजेएनटी आणि एसबीसी घटकातील १५ हजार विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
महाज्योतीतर्फे २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी निवड केली जाणार आहे. सध्या ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून भविष्यात इंजिनिअर, डॉक्टर होऊ इच्छित आहेत, त्यांना या प्रशिक्षणासाठी अर्ज करता येणार आहे. २० महिन्यांचे प्रशिक्षण देणार असून याचा फायदा बारावीच्या परीक्षेनंतर २०२४ मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी होणार आहे. हे प्रशिक्षण जुलैपासून सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण घेता यावे, यासाठी मोफत टॅब व दररोज सहा जीबी इंटरनेट देणार आहे. सामान्य, गरीब विद्यार्थ्यांना लाभ होण्यासाठी ही योजना आहे. समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी केले आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया, नियम व अटी
- १ पासून अर्ज प्रक्रिया सुरु, प्राधान्याने प्रवेश दिला जाणार
- www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल
- अकरावी विज्ञान शाखेला प्रवेश घेतल्यानंतर प्राचार्यांचे पत्र आणि बोनाफाईड सर्टिफिकेट सादर करणे अनिवार्य
- ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेत ७० टक्के गुण आवश्यक
- आदिवासी बहुल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ६० टक्के गुण आवश्यक
- नॉन क्रिमिलेयरचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63548 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top