रमाकांत तांबोळी म्हणजे माणसे घडवणारी शाळा विद्यार्थी सहायक समिती आयोजित सभेत मान्यवरांची श्रद्धांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रमाकांत तांबोळी म्हणजे
माणसे घडवणारी शाळा

विद्यार्थी सहायक समिती आयोजित सभेत मान्यवरांची श्रद्धांजली
रमाकांत तांबोळी म्हणजे माणसे घडवणारी शाळा विद्यार्थी सहायक समिती आयोजित सभेत मान्यवरांची श्रद्धांजली

रमाकांत तांबोळी म्हणजे माणसे घडवणारी शाळा विद्यार्थी सहायक समिती आयोजित सभेत मान्यवरांची श्रद्धांजली

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमाकांत तांबोळी यांनी विद्यार्थी सहायक समिती, समवेदना, नवरंगे बालकाश्रम, रिमांड होम बारामती व नगर, तसेच स्नेहालय आदी संस्थांच्या माध्यमांतून हजारो विद्यार्थ्यांना घडवले. कडक शिस्त आणि तितकाच प्रेमळ स्वभाव आणि प्रत्येकाला भरभरून देण्याची वृत्ती यामुळे तांबोळी यांचा सहवास परिसस्पर्शासारखा होता. त्यांच्या जाण्याने माणसे घडवणारी शाळाच हरवली आहे, अशी भावना श्रद्धांजली सभेत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

विद्यार्थी सहायक समितीच्या वतीने आपटे वसतिगृहात तांबोळी यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. या प्रसंगी समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, शिक्षणतज्ज्ञ भाऊसाहेब जाधव, ‘वनस्थळी’च्या भारती भिडे, अफार्मच्या सुधा कोठारी, पंढरपूर येथील अन्नपूर्णा संस्थेचे सुरेश खिस्ते, माजी विद्यार्थी विश्वास देवकर, राजू इंगळे, पुष्पा थोरात, सुरेश उमाप, तांबोळी यांच्या कन्या सुनीता व विद्या यांच्यासह इतरांनी भावना व्यक्त केल्या.

या वेळी पवार म्हणाले, ‘‘समितीमुळे तांबोळी यांचा संबंध आला. विद्यार्थी आणि समाजाविषयी त्यांच्या मनात प्रचंड तळमळ होती. एखादा विषय हाती घेतला, तर तो तडीस नेण्याचा त्यांचा स्वभाव होता. तांबोळी यांनी अनेक विद्यार्थी घडवले. माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे हे विचार पुढे न्यावे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.’’ भाऊसाहेब जाधव म्हणाले, ‘‘तांबोळी सरांसारखी माणसे फार थोडी असतात. त्यांनी आजीवन समाजसेवी संस्थांमध्ये काम केले. सतत संस्थेचे, समाजाचे भले होण्यावर त्यांचा भर असे.’’ ‘‘ग्रामीण भागातील अधिकाधिक विद्यार्थी शहरात येऊन शिक्षित होतील, यासाठी ते प्रयत्नशील होते. तसेच यामध्ये विद्यार्थिनींचा सहभाग वाढावा, अशी त्यांची इच्छा होती,’’ असे मत सुधा कोठारी यांनी व्यक्त केले.

फोटो : 64259

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63572 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top