पुणे विद्यापीठात ‘प्लेसमेंट सेल’ च्या इमारतीचे उद्‌घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे विद्यापीठात ‘प्लेसमेंट सेल’ च्या इमारतीचे उद्‌घाटन
पुणे विद्यापीठात ‘प्लेसमेंट सेल’ च्या इमारतीचे उद्‌घाटन

पुणे विद्यापीठात ‘प्लेसमेंट सेल’ च्या इमारतीचे उद्‌घाटन

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘प्लेसमेंट सेल अँड कॉर्पोरेशन सेल’च्या नव्या इमारतीचे उद्‌घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते नुकतेच झाले.
यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, प्लेसमेंट सेलचे प्रमुख मार्गदर्शक संजीव मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. करमळकर म्हणाले,‘‘अनेक उद्योगांची संशोधन आणि प्रयोगशाळेची केंद्र विद्यापीठात व्हावी, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. रिसर्च पार्क फाउंडेशन, सिफोरआयफोर संस्था आणि हे प्लेसमेंट सेल हे सगळं एकमेकांशी संबंधित असल्याने हे एकच ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करत आहोत. या सगळ्यातून ‘हेतूसह शिक्षण’ ही संकल्पना साध्य करत उद्योग आणि शिक्षण यांचा समन्वय घडवून आणण्याचे काम करत आहोत.’’ डॉ. पवार म्हणाले, ‘‘प्लेसमेंट सेल ॲण्ड कॉर्पोरेशन सेल असणारे हे राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे. आतापर्यंत प्लेसमेंट सेल विकेंद्रीत होते. मात्र पहिल्यांदा अशा प्रकारे विद्यापीठाचे असे अधिकृत प्लेसमेंट सेल उभे राहिले आहे. एकाच वेळी अनेक निवड प्रक्रिया, मुलाखती, मेळावे असे अनेक कार्यक्रम घेता येणार आहेत.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63575 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top