
अवती भवती
सम्राट अशोक सेनेतर्फे अभिवादन
पुणे, ता. १४ ः छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने सम्राट अशोक सेनेतर्फे डेक्कन परिसरातील महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केले. यावेळी सेनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद चव्हाण, संदीप देबडे, महिंद्र जगताप, विनोद चंडालिया, कमरुनिसा शेख आदी उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराज उद्यानात महाराजांचा पुतळा बसवा
पुणे, ता. १४ ः छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने संभाजी ब्रिगेडतर्फे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ब्रिगेडचे शहराध्यक्ष अविनाश मोहिते, संतोष शिंदे, महादेव मातेरे, संदीप कारेकर, शंकर कुटे, राजेश अडसूळ, कुमार पवार, नरेश पडवळ, अभिजित मोरे, माया पवार, आदित्य खेडेकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी ब्रिगेडने छत्रपती संभाजी महाराज उद्यानात छ. संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा, तसेच त्यांच्या विचारांचे स्मारक उभारावे, अशी मागणी केली.
संजीवनी करंदीकर यांच्या निधनाने शिवसैनिकांचा मायेचा हात हरवला
पुणे, ता. १४ : समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांची कन्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आत्या संजीवनी करंदीकर यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण शिवसेना परिवाराला असलेला मायेचा आणखी एक हात आज गमावला आहे. त्यांची सुकन्या कीर्ती फाटक आणि सर्व करंदीकर कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांच्या जाण्याने झालेले दुःख कधीही भरून न येणारे आहे. प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा, त्यांनी आयुष्यामध्ये दाखवलेले धाडस आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासातून तयार झालेली समाजाच्या प्रश्नांकडे पाहण्याची अभ्यासपूर्ण दृष्टी त्यांनी जोपासली होती. त्यांची शिकवण, संस्कार आणि विचार यांचे ऋण शिवसेना परिवारावर कायमच राहतील. या शब्दात विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी करंदीकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63585 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..