बांठिया समिती येत्या शनिवारी पुण्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांठिया समिती येत्या शनिवारी पुण्यात
बांठिया समिती येत्या शनिवारी पुण्यात

बांठिया समिती येत्या शनिवारी पुण्यात

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाला (ओबीसी) आरक्षण देण्यासाठी माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेला समर्पित आयोग येत्या शनिवारी (ता. २१) पुणे विभागाच्या दौऱ्यावर येणार आहे. या वेळी हा आयोग पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात विभागातील नागरिकांची ओबीसी आरक्षणाबाबत मते जाणून घेणार आहे. यासाठी विभागात ओबीसी आरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्था, संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांशी आयोगामार्फत चर्चा केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकारने हा समर्पित आयोग स्थापन केला आहे. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे (ओबीसी) आरक्षण रद्द झाले आहे. या प्रवर्गाला हे आरक्षण पूर्ववत मिळावे, यासाठीचा अभ्यास करून हा आयोग राज्य सरकारला अहवाल सादर करेल.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पूर्वी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २७ टक्के जागा आरक्षित होत्या. परंतु, काही तांत्रिक मुद्यांवर सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले. या प्रवर्गाला आरक्षण देण्यासाठी आवश्‍यक असलेला इंपेरिकल डेटा उपलब्ध असल्याशिवाय हे आरक्षण देता येणार नसल्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारने हे आरक्षण देण्यासाठी आवश्‍यक असलेली माहिती मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा आयोग स्थापन केला आहे.

निवेदनासाठी नावाची नोंदणी अनिवार्य
हा आयोग पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांची ओबीसी आरक्षणाबाबतची मते जाणून घेणार आहे. यासाठी नागरिक, संस्था आणि संघटनांची लेखी निवेदने स्वीकारली जाणार आहेत. मात्र आयोगाकडे निवेदन सादर करण्यासाठी किंवा आयोगापुढे मत सादर करण्यासाठी येत्या शुक्रवारपर्यंत (ता. २०) विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन देणाऱ्या व्यक्तींनी नावाची नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63614 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top