बसचालकांना सिंहगडच्या घाटात धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बसचालकांना सिंहगडच्या घाटात धडे
बसचालकांना सिंहगडच्या घाटात धडे

बसचालकांना सिंहगडच्या घाटात धडे

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः सिंहगडच्या घाटात शुक्रवारी (ता. १३) अपघात झाल्यानंतर पीएमपी प्रशासनाने तत्काळ पावले उचलत शनिवारपासून ई बसचालकांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. शनिवारी पहिल्या दिवशी १५ चालकांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच सोमवार (ता. १६) पासून चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी आरखडा तयार केला जात आहे. रविवार (ता. १५) सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सिंहगडावर येऊन रस्त्यांची पाहणी करणार आहेत. या वेळी वन विभाग व पीएमपीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील.
सिंहगडच्या घाटात ई बसच्या झालेल्या अपघातानंतर रस्ता व चालकांचे प्रशिक्षण या दोन्ही मुद्द्यांवर पीएमपीने काम करण्यास सुरुवात केली. शनिवारी यांत्रिक विभागाचे मुख्य अभियंता सुहास बुरसे हे स्वतः चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी उपस्थित होते. त्यांनी चालकांचे समुपदेशन तर केलेच, शिवाय त्यांना बसखाली घेऊन येत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे. कमी जागेत वळण कसे घ्यायचे, वेग किमान १० ते १५ इतकाच ठेवणे, गडावर बस कशी लावावी आदींबाबतचे मार्गदर्शन केले. सोमवारपासून आरटीओचे माजी अधिकारी सुबोध मेडशीकर हेदेखील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत.

कठडे हवेत मजबूत
शुक्रवारी ई बसच्या झालेल्या अपघातात बस कठड्याला धडकली अन् प्रवासी बालंबाल बचावले. मात्र बसच्या छोट्या धडकेत कठड्याचे नुकसान झाले. या ठिकाणी असलेले कठडे हे मजबूत असणे गरजेचे आहे. नुसत्या धक्क्याने जर कठड्याची पडझड होत असेल तर त्याची तत्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्यामुळे सार्वजनिक व वन विभागाने प्रवासी सुरक्षेसाठी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

ई बसचालकांच्या प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे. सोमवारपासून त्यावर विस्तृत काम केले जाईल. तसेच वन विभागाच्या सहकार्याने सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याची कामे करणार आहे.
- डॉ. चेतना केरुरे, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी, पुणे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63617 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top