सुकन्या समृद्धी कार्डचे शालेय विद्यार्थिनींना वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुकन्या समृद्धी कार्डचे शालेय विद्यार्थिनींना वाटप
सुकन्या समृद्धी कार्डचे शालेय विद्यार्थिनींना वाटप

सुकन्या समृद्धी कार्डचे शालेय विद्यार्थिनींना वाटप

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः पुण्यातील वसंतदादा प्रतिष्ठानने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे वडील सोपानराव कामठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोंढवा येथील १०० शालेय विद्यार्थिनींना माजी नगरसेवक संजय बालगुडे यांच्या हस्ते सुकन्या समृद्धी योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी स्वर्गीय सोपानराव कामठे वाचनालयाचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी जालिंदर कामठे, शिवाजीराव मरळ, मधुकर धांडेकर, बजरंग वाघ, सुखदेव लोणकर, साहेबराव धांडेकर, अनिल कामठे, सोमनाथ कामठे, चिंतामण जगताप, सदाशिव कामठे आदी उपस्थित होते. या समारंभापूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजीराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाराजांना आदरांजली वाहण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63628 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top