सैनिक पत्नी संघाच्या वतीने व्हीलचेअरचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सैनिक पत्नी संघाच्या वतीने व्हीलचेअरचे वाटप
सैनिक पत्नी संघाच्या वतीने व्हीलचेअरचे वाटप

सैनिक पत्नी संघाच्या वतीने व्हीलचेअरचे वाटप

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या सैनिक पत्नी कल्याण संघाच्या (एडब्ल्यूडब्ल्‍यू) प्रादेशिक अध्यक्ष अनिता नैन यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग सैनिक, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबातील दिव्यांग सदस्यांसाठी एक अनोखी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये रेनॉल्ट इंडियाचे प्रतिनिधी व मनुष्यबळ विकास प्रमुख कॅप्टन प्रणव प्रसून ठाकूर (निवृत्त) यांच्या हस्ते आठ इलेक्ट्रिक व्हीलचेअर (निओबेल्ट) या दिव्यांग सैनिक व त्यांच्या कुटुंबातील दिव्यांग सदस्यांना सुपूर्द करण्यात आल्या. आयआयटी मद्रास इनक्युबेटेड स्टार्टअप निओ मोशनच्या सहकार्याने हे निओबेल्ट विकसित करण्यात आले असून हे व्हीलचेअर उंच-सखल भूभागावर देखील सहज वापरले जाऊ शकते. यामुळे अशा ठिकाणी दिव्यांगांना हालचाल करणे सुलभ होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63660 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top