बनावट पॅनकार्ड तयार करणाऱ्यास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बनावट पॅनकार्ड तयार करणाऱ्यास अटक
बनावट पॅनकार्ड तयार करणाऱ्यास अटक

बनावट पॅनकार्ड तयार करणाऱ्यास अटक

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः बनावट मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड तयार करून देणाऱ्या एका व्यक्तीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पुणे स्टेशन परिसरातून अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून दहा बनावट मतदार ओळखपत्र जप्त केली. तसेच त्याच्याकडील संगणकामध्ये बनावट मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड बनविल्याचेही पोलिस तपासात आढळून आले.

कल्पेश रमेश बोहरा (वय ४२, रा. नम्रता सदन, खामगाव, बुलढाणा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी मधुकर तुपसौंदर यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बोहराचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. तसेच तो नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन त्यांना बनावट मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड तयार करून देत होता. याबाबतची माहिती खंडणी विरोधी पथकास मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरात सापळा लावून त्यास पकडले.
बोहराकडून वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावाची दहा बनावट मतदार ओळखपत्र जप्त केली आहेत. याबरोबरच त्याचा संगणक जप्त केला आहे. त्यामध्येही काही जणांची नावाने बनावट मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड तसेच काहीजणांची छायाचित्रे आढळून आली आहेत. बोहरा हा बनावट मतदार ओळखपत्र तयार करून देण्यासाठी दहा हजार रुपये घेत होता. अशी प्राथमिक माहिती त्याच्या चौकशीतून पुढे आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत करत आहेत.
---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63712 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top