
आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन
लोगो---------आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन
सुटीचा आनंद अन् अभ्यासही!
१) महात्मा फुले संग्रहालय, घोले रस्ता, शिवाजीनगर
- वैशिष्ट्ये
- मुघल आणि मराठा शासकांचे शस्र
- हस्तशिल्प, खनिजे, विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, कीटक
- साप आणि मासे यांचा टॅक्सीडर्मी संग्रह
- सशुल्क
- वेळ ः सकाळी ९ ते संध्या. ५ वा.
- सर्व दिवस खुले
(फोटो ः 64451)
-------------
२) लोकमान्य टिळक संग्रहालय, केसरी वाडा
वैशिष्ट्ये
- लोकमान्यांचा जीवनपट मांडणारे संद्रहालय
- त्यांच्या हस्ताक्षरातील पत्रे, गीचारहस्य, दुर्मिळ छायाचित्रे, अभ्यासिका
- मंडाले कारागृहाची प्रतिकृती
- निशुल्क
- वेळ ः सकाळी १० ते दुपारी १, दुपारी ३ ते ६
- सर्व दिवस खुले (१५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे ला सुटी)
(फोटो ः 64441)
------
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, सेनापती बापट रस्ता
वैशिष्ट्ये
- डॉ. आंबेडकर यांच्या वैयक्तीक संग्राहातील वस्तू
- कपडे, छायाचित्रे, अस्थिकलश
- गांधीजींना लिहिलेल्या पत्रांचा संग्रह
- सशुल्क
- वेळ ः सकाळी ९ ः ३० ते संध्याकाळी ५ ः ३०
- सर्व दिवस खुले
(फोटो ः 64375)
----------------
४) फरीद शेख कॅमेरा म्युझीयम, कोंढवा बुद्रुक
वैशिष्ट्ये
- शंभर वर्षांपासूनचा कॅमेरांचा प्रवास
- आजवरचे बहुतेक प्रकारांतील कॅमेरे पाहण्यासाठी उपलब्ध
- निःशुल्क
- वेळ ः सकाळी १० ते दुपारी २ आणि दुपारी ४ ते संध्याकाळी ६
- सर्व दिवस खुले
(फोटो ः 64350)
-------------------
५) राष्ट्रीय युद्ध संग्रहालय, घोरपडी
वैशिष्ट्ये
- युद्धकाळात भारतीय सैन्याने वापरलेली रणगाडे, विमाने, रॉकेट, बंदुका आदींचा संग्रह
- अगदी मराठा साम्राज्याच्या कालखंडापर्यंतच्या गोष्टी मांडल्या आहेत
- युद्धात जप्त केलेले पाकीस्तानचे रनगाडे, श्रीलंकेतील लिट्टे विरुद्धच्या मोहिमेतील युद्ध साहित्य
- वेळ ः सकाळी ९ ः ३० ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते संध्याळी ७ ः ३०
- निःशुल्क
- सुटीचा दिवस ः मंगळवार
(फोटो ः 64333)
---------------
६) राजा केळकर संग्रहालय, बाजीराव रस्ता
वैशिष्ट्ये
- शंभर वर्षांपूर्वीपासूनच्या अगदी फुंकणीपासून ते अत्तरदाणीपर्यंत रोजच्या वापरातील वस्तू
- विविध प्रकारचे दिवे, अडकित्ते, गंजीफा, सोंगट्या, शस्त्रे, पानदाने, पेटारे, दरवाजे, मूर्ती, कात्र्या, कळसूत्री बाहुल्या
- कोथरूड येथून मस्तानीचा महाल उचलून आणला आणि संग्रहालयात हुबेहूब तसा उभा केला आहे
- सशुल्क
- वेळ ः सकाळी १० ते संध्याकाळी ५ ः ३० वाजेपर्यंत
- सर्व दिवस खुले
(फोटो ः 64282, 64283 )
---------------------
७) पेशवे संग्रहालय, पर्वती
वैशिष्ट्ये
- पेशवे राज्यकर्त्यांशी संबंधित शस्त्रे, कपडे, भांडी, दागिने, फर्निचर, वाद्ये आणि पालखी अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे
- ऐतिहासिक घटना आणि पेशव्यांचा कौटुंबिक नकाशा यानुसार बाजीराव पेशवे, मस्तानी, नानासाहेब पेशवे, चिमाजीअप्पा पेशवे, बाळाजी विश्वनाथ या मराठा नेत्यांची चित्रे आहेत.
- पेशव्यांशी संबंधित मध्ययुगीन हस्तलिखिते, तसेच पुणे शहराची काही जुनी व दुर्मिळ छायाचित्रेदेखील या संग्रहालयात आहेत. भारतात पेशवे, मुघल आणि ब्रिटिशांच्या काळात वापरल्या गेलेल्या असंख्य नाणी व चलनांचा संग्रह
- सशुल्क
- वेळ ः सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत
- सर्व दिवस खुले
( फोटो ः 64291)
------------------
८) क्रिकेट संग्रहालय, सहकारनगर
वैशिष्ट्ये
- रोहन पाटे यांनी ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियमची स्थापना केली. संग्रहालयात ५१ हजार हून अधिक क्रिकेटच्या वस्तू आहेत
- विश्वचषक विजेत्या संघाच्या कर्णधारांनी स्वाक्षरी केलेली बॅट; सर डोनाल्ड ब्रॅडमन, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी, डेसमंड हेन्स, सर अॅलिस्टर कुक, सर व्हिव्ह रिचर्ड्स, रिकी पाँटिंग, इम्रान खान, सुनील गावसाकर, वसीम अक्रम, जॅक कॅलिस, सौरव गांगुली आणि विराट कोहली यांनी स्वाक्षरी केलेल्या आणि वापरलेल्या वैयक्तिक क्रिकेट वस्तू
- विश्वचषक विजेत्या संघाच्या प्रत्येक सदस्याने स्वाक्षरी केलेले बॅट
- सशुल्क
- वेळ सकाळी १०ः३० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत
- सर्व दिवस खुले
(फोटो ः 64293)
---------------
९) विक्रम पेंडसे सायकल संग्रहालय, कर्वेनगर
वैशिष्ट्ये
- दीडशेपेक्षा अधिक दुर्मिळ सायकलींचा संग्रह
- सशुल्क
- वेळ ः सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत
- फक्त शनिवार आणि रविवार खुले
(फोटो ः 64383)
------------
१०) आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरी, बालेवाडी
वैशिष्ट्ये
प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या बालपनापासून ते त्यांच्या शेवटच्या व्यंगचित्रापर्यंतचा प्रवास मांडणारे संग्रहालय.
- निशुल्क
- वेळ ः सकाळी ९ ते संध्याकाळी ५
- सर्व दिवस खुले
(फोटो ः 64380)
--------
११) कै. केशवराव जगताप अग्निशामक संग्रहालय, एरंडवणे
वैशिष्ठे
- भारतातील पहिले अग्निशामक संग्रहालय
- जवळपास १५ प्रकारच्या आपत्तीच्या वेळी मदतीसाठी लागणारे साहित्य आहे
- शिवाय प्राथमिक स्तरांवर प्रशिक्षण देण्याची देखील सुविधा आहे
- निशुल्क
- वेळ : सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत
- सर्व दिवस खुले
(फोटो ः 64386)
----------
१२) रेल्वे म्युझियम, करिश्मा चौक जवळ, कर्वे नगर, कोथरूड
वैशिष्ट्ये
- रेल्वेच्या मूळ आकाराच्या ८७ पट लहान आकारचे इंजिन व डबे
- १८ फूट आकाराच्या बोर्डवर केवळ रेल्वे स्थानकच नाही तर संपूर्ण शहराची प्रतिकृती वसवली आहे
- वाफेवर धावणारे इंजिनपासून ते जगातली सर्वांत वेगवान समजली जाणारी आयसीइ रेल्वेचे देखील छोटे रूप इथे पाहण्यास उपलब्ध आहे
- सशुल्क
- वेळ : सकाळी साडे नऊ ते दुपारी पाच
- सर्व दिवस खुले (फक्त रविवारी दुपारी ५ ते रात्री ८)
(फोटो ः 64387)
---------
१३) आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय, क्वीन्स गार्डन
वैशिष्ट्ये
- आदिवासी साहित्य संस्कृती, आदिवासी कलादालन, बोहाड्याचे मुखवटे
- बांबू कामाच्या वस्तू दालन, आदिवासी दागदागिने व देवदेवता
- मोकळ्या आवारातील आदिवासी झोपड्यांच्या प्रतिकृती, आदिवासी हस्तकलांची झलक
- सशुल्क (ऑनलाईन बुकींग सुविधा)
- संग्रहालयाची वेळ ः सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३०
- सरकारी सुट्ट्या वगळता, सर्व दिवस खुले
( फोटो ः 63923)
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63729 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..