राज्यामध्ये सीईटी परीक्षांसाठी ११ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यामध्ये सीईटी परीक्षांसाठी 
११ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
राज्यामध्ये सीईटी परीक्षांसाठी ११ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

राज्यामध्ये सीईटी परीक्षांसाठी ११ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : राज्यात विविध १६ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ११ लाख १६ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यातील नऊ लाख ५० हजार ८७४ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चिती केली आहे. तर उर्वरित एक लाख ६५ हजार ७९१ विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण स्थितीत आहेत.

उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या आठ अभ्यासक्रमांसह फाइन आर्ट्स अभ्यासक्रम वगळता, अन्य सर्वच अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांसाठी असणारी ऑनलाइन नोंदणीची मुदत आता संपली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) तंत्रशिक्षण संचालनालय, उच्च शिक्षण संचालनालय आणि कला संचालनालय यांच्या अखत्यारित येणाऱ्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १६ प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अशा पदवी अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी सहा लाख ८९ हजार ४९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये पीसीबी ग्रुपसाठी तीन लाख २४ हजार ७८३ विद्यार्थ्यांनी, तर पीसीएम ग्रुपसाठी दोन लाख ८१ हजार ३५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापाठोपाठ एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमासाठी एक लाख ६० हजार ७८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती सीईटी सेलने दिली आहे. तंत्रशिक्षण अभ्यासक्रमातील ‘बी एचएमसीटी- सीईटी’साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया येत्या १९ मेपर्यंत सुरू राहणार आहे.

सीईटी परीक्षा : नोंदणी केलेले विद्यार्थी: अर्ज अपूर्ण असलेले : अर्ज निश्चित केलेले एमएचटी (पीसीबी) : ६,८९,४९६ : ८३,३५४ : ३,२४,७८३
एमएचटी (पीसीएम) : - : - : २,८१,३५९
एमबीए/एमएमएस : १,६०,७८१ :२३,१४४ : १,३७,६३७
एमसीए- सीईटी : ४४,५३१ : ६,३६७ : ३८,१६४
एम एचएमसीटी : १३० : ८९ : ४१
एम आर्च : १,०५३, २१४ : ८३९
..................
एकूण १६ अभ्यासक्रमची आकडेवारी : ११,१६,६६५ : १,६५,७९१ : ९,५०,८७४

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63789 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top