कोरोनाकडे दुर्लक्ष नको ः रुग्णांच्या संख्येत दर आठवड्याला सौम्य वाढ राज्यात पुन्हा वाढू लागला संसर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाकडे दुर्लक्ष नको ः रुग्णांच्या संख्येत दर आठवड्याला सौम्य वाढ
राज्यात पुन्हा वाढू लागला संसर्ग
कोरोनाकडे दुर्लक्ष नको ः रुग्णांच्या संख्येत दर आठवड्याला सौम्य वाढ राज्यात पुन्हा वाढू लागला संसर्ग

कोरोनाकडे दुर्लक्ष नको ः रुग्णांच्या संख्येत दर आठवड्याला सौम्य वाढ राज्यात पुन्हा वाढू लागला संसर्ग

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : राज्यात एप्रिलच्या मध्यापासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दर आठवड्याला सौम्य वाढ दिसून येत आहे. गेल्या सलग चार आठवड्यांपासून वाढणारे कोरोनाबाधितांचे आकड्यांकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
राज्यात कोरोनाच्या तीन लाटांचा उद्रेक आतापर्यंत झाला आहे. त्याच वेळी देशातील दिल्ली, राजस्थान अशा काही राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वाढीचा वेग सौम्य आहे, असेही आरोग्य खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.
राज्यात जानेवारीपासून कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा उद्रेक झाला. त्यानंतर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. मात्र, या व्हेरियंट श्वसनसंस्थेच्या वरच्या भागापुरताच मर्यादित राहिला. यापूर्वी पहिल्या लाटेत आलेल्या अल्फा आणि दुसऱ्या लाटेत थैमान घातलेल्या डेल्टा व्हेरियंटचे रुग्णांचे थेट फुफ्फुसावर हल्ला केला होता. त्या तुलनेत तिसऱ्या लाटेतील ओमिक्रॉन व्हेरियंट सौम्य असल्याचे जाणवले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची गरज लागली नाही. त्यानंतर मार्चपासून रुग्णसंख्या सातत्याने कमी होऊ लागली.

का वाढ झाली?
- कोरोनाची साथ आता एन्डामिक झाली आहे. याचा अर्थ, अशा प्रकारचे कमी-अधिक प्रमाणात रुग्ण आढळत राहातील.
- सध्या आढळणारे रुग्णांना ओमिक्रॉन याच व्हेरियंटचा संसर्ग होत आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागत नाही.

आरोग्य खात्याचे निरीक्षण...
- राज्यात दररोज दीडशे ते पावणेदोनशेच्या दरम्यान रुग्ण आढळत आहेत. ही फार मोठी नाही.
- राज्यात कोरोना संसर्गाचा दर अद्यापही एक टक्क्यांपेक्षा कमी आहे.
- कोरोना संसर्ग झालेले ९५ टक्के रुग्णांना कोणतीही ठळक लक्षणे नाहीत.

काय काळजी घ्यावी?
- नागरिकांनी कोरोना संसर्गाबाबत हलगर्जीपणा करू नये
- गर्दीच्या ठिकाणी, रुग्णालयात, दवाखान्यात जाताना मास्क वापरावा
- राज्याचे मास्कची सक्ती केली नसली तरीही सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर करावा
- कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी
- वारंवार हात स्वच्छ पाण्याने धुवावे
- नाक, तोंड याला वारंवार हाताने स्पर्श करू नये

राज्यातील बहुसंख्य लोकांना ओमिक्रॉन होऊन गेल्याने ही दिसणारी वाढ कमी आहे. ओमिक्रॉनमुळे मिळालेली संरक्षण शक्ती कमी झाल्यास रुग्णसंख्येचा आकडा आणखी वाढू शकतो. कोरोनाकडे आपण आता पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. कोरोनाचा विसर पडायला नको, हेच वाढणारे रुग्णांचे आकडे सांगत आहेत.
- डॉ. सुभाष साळुंखे, राज्याच्या आरोग्य मंत्र्यांचे सल्लागार

राज्यात असे वाढले रुग्ण
आठवडा ..................... रुग्णसंख्या
११ ते १७ एप्रिल ........ ३६७
१८ ते २४ एप्रिल ........ ९३७
२५ एप्रिल ते १ मे ...... ९७६
२ ते ८ मे .................. १२८५
९ ते १५ मे ................. १४४१
(स्रोत : सार्वजनिक आरोग्य विभाग)

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण : ९८.१० टक्के
राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर : १.८७ टक्के

कोरोना संसर्गाचा दर : ९.७८ टक्के
आतापर्यंत तपासण्यात आलेले प्रयोगशाळा नमुने : ८,०५,५९,९७१
कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या : ७८,८०,८४०
राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या : १,५१८

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63838 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top