पुण्याच्या तापमानात पुन्हा किंचित वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्याच्या तापमानात पुन्हा किंचित वाढ
पुण्याच्या तापमानात पुन्हा किंचित वाढ

पुण्याच्या तापमानात पुन्हा किंचित वाढ

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : पुणे शहर परिसरात सध्या निरभ्र वातावरण असून उन्हाचा चटका जाणवत आहे. कमाल तापमानात पुन्हा वाढ होत आहे. रविवारी पुणे शहरात ३७.६, तर लोहगावात ३८.३ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील तीन ते चार दिवस ही कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी शहर परिसरात ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका कमी झाला होता. असानी चक्रीवादळाचा पुण्यावरही काहीसा परिणाम झाला होता. मात्र, आता पुन्हा आकाश निरभ्र झाल्याने उन्हाचा चटका काहीसा वाढला आहे. पुढील चार दिवस म्हणजेच गुरुवारपर्यंत (ता. १९) परिसरात आकाश निरभ्र राहणार आहे. त्यानंतर मात्र अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.

राज्यात पावसासाठी पोषक हवामान निर्माण होत असून तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तसेच पुढील दोन दिवस विदर्भातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. नागपूर, अमरावती, ब्रम्हपुरी आणि वर्धा येथे सध्या पारा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे. तर रविवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद चंद्रपूर येथे ४६.८ अंश सेल्सिअस इतकी झाली. दरम्यान, पुढील दोन दिवस विदर्भातील काही ठिकाणी उन्हाच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
बंगालच्या उपसागरात सध्या नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि लगतच्या उपसागरात दाखल होण्याची शक्यता आहे. अंदमान-निकोबार बेटांवर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तर राज्यातही पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असून पुढील चार दिवस दक्षिण मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तसेच कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63849 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top