अवतीभवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवतीभवती
अवतीभवती

अवतीभवती

sakal_logo
By

‘जातकयज्ञ’ या पौराणिक नाटकाचे सादरीकरण
पुणे, ता. २७ ः आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित आणि श्रुती संगीत निकेतन अहमदनगर प्रस्तुत ‘संगीत जातकयज्ञ’ या दोन अंकी नवीन पौराणिक संगीत नाटकाचे नुकतेच सादरीकरण झाले. या नाटकाचे लेखन डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी केले असून दिग्दर्शन डॉ. धनश्री खरवंडीकर यांचे आहे. तर, डॉ. खरवंडीकर, देवीप्रसाद सोहोनी, अनिकेत देऊळगावकर, अनुजा कुलकर्णी, संकेत शाह आदी कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. ज्येष्ठ संगीततज्ज्ञ डॉ. विकास कशाळकर, ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे, समुपदेशक दत्तात्रय कोहिनकर, बालगंधर्व रसिक मंडळ संस्थेचे अध्यक्ष सुरेश साखवळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. याप्रसंगी गायक राजेश दातार, गायिका आसावरी असेरकर, ज्येष्ठ ऑर्गनवादक राजीव परांजपे, ज्येष्ठ तबलावादक पांडुरंग मुखडे, धनंजय खरवंडीकर, ज्येष्ठ गायक-अभिनेते रवींद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अनिता दीक्षित यांनी केले.

‘माझा आनंद’ पुस्तकाचे शुक्रवारी प्रकाशन
पुणे, ता. २७ ः ‘धर्मवीर’ चित्रपटाचा प्रवास आता पुस्तकरूपाने उलगडणार आहे. या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारलेला अभिनेता प्रसाद ओक यांनी ही भूमिका साकारताना आलेला अनुभव शब्दबद्ध केला आहे. ‘माझा आनंद’ असे या पुस्तकाचे नाव असून येत्या शुक्रवारी (ता. ३०) नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृह येथे सकाळी ११ वाजता त्याचे प्रकाशन होणार आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे या पुस्तकाचे प्रकाशित केले आहे. प्रकाशन समारंभाला निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे तसेच मंजिरी ओक, प्रज्ञा पोवळे आदी उपस्थित राहणार आहेत.