
अवतीभवती
पालखी देखाव्यांची रंगरंगोटी प्रशासनाने करावी
पुणे : पालखी सोहळ्याचे आगमन जून महिन्यात पुण्यामध्ये होणार आहे. त्या अगोदर शहरामध्ये असलेल्या पालखी देखाव्यांची रंगरंगोटी प्रशासनाने करावी अशी मागणी अनिल अगावणे यांनी केली. ऐतिहासिक वास्तू ओंकारेश्वर मंदिराजवळील आकाशाला गवसणी घालणारा विठ्ठलाचा पालखी देखावा, तसेच नाना पेठेतील पालखी देखावा, हे देखावे बनवल्यापासून साफसफाई न केल्यामुळे ते धुळीने माखले आहेत. सोहळा पाहण्यासाठी देशभरातून येणाऱ्या पर्यटकांचे व पुण्यातील हजारो वारकरी भक्तांचे हे देखावे पाहून मनोबल वाढावे यासाठी प्रशासनाने देखाव्यांची रंगरंगोटी पालखी सोहळ्याच्या आगमनापूर्वी करावी, असे अगावणे यांनी सांगितले.
आरपीआयतर्फे गौतम बुद्ध जयंती
पुणे : जगाला शांती व मैत्रीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्ध यांची जयंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (ए)साजरी केली. या वेळी जिल्हाध्यक्ष विकास साळवे, डॉ. प्रशांत पगारे, सुनील उबाळे, एम जे जोसेफ, गणेश भोसले, विलास घोरपडे, राजेंद्र गायकवाड, मंगल सोनवणे आदी उपस्थित होते. अशोक तनपुरे, विजय कसबे, स्वाती बरगंडी, मनोज घोलप, अरुण भिंगारदिवे, नितीन चव्हाण यांनी यासाठी परिश्रम घेतले.
महाराणा प्रतापसिंह सेना स्थापनेची घोषणा
पुणे : महाराणा प्रतापसिंह सेना या नवीन पक्षाची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा झाली आहे. राष्ट्रीय व प्रादेशिक स्तरावर नवीन पदाधिकारी तसेच कोअर कमिटी स्थापन केली जाणार असून, इच्छुक सभासदांनी शुक्रवारी (ता. २०) बाजीराव रस्ता येथील महाराणा प्रतापसिंह उद्यान येथे सायंकाळी ५ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षप्रमुख गणेश साळुंके यांनी केले.