
बलात्कार करणाऱ्याला २५ वर्षे सक्तमजुरी
पुणे, ता. २३ : बदनामी करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला २५ वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा निकाल दिला. संतोष बाळू डोंगरे (वय २५, रा. हडपसर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
सरकारी रुग्णालयातील स्त्रीरोग प्रसूती तंत्र विभागातील महिलेने हडपसर पोलिसांत फिर्याद दिली आहे. फेब्रुवारी ते मे २०१५ या कालावधीत हा प्रकार घडला. घटनेच्यावेळी आरोपीचे लग्न झाले होते. तरीही त्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती राहिली. तिने बाळाला जन्म दिला आहे. तिच्याशी लग्नही केले नाही. बाळाची जबाबदारीही घेतली नाही. त्यामुळे त्याला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी केली.
घरात घुसून बदनामी करण्याची धमकी देत तोंड दाबून त्याने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर अशीच धमकी देऊन तीन महिने हे कृत्य तो करत राहिला. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या खटल्यात ॲड. ब्रह्मे यांनी आठ साक्षीदार तपासले. त्यामध्ये डीएनए चाचणीचा सकारात्मक अहवाल, फिर्यादी, पीडित यांची साक्ष महत्त्वाची ठरली. आर. एस. माळी यांनी या प्रकरणाचा तपास केला. न्यायालयीन कामकाजासाठी आर. एन. कांबळे आणि जे. एन. जरक यांनी मदत केली. दंडाची रक्कम मुलीला देण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d82441 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..