जमीन प्रकरणात रवींद्र बऱ्हाटेला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जमीन प्रकरणात रवींद्र बऱ्हाटेला अटक
जमीन प्रकरणात रवींद्र बऱ्हाटेला अटक

जमीन प्रकरणात रवींद्र बऱ्हाटेला अटक

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : बनावट कागदपत्रे तयार करून एकता सहकारी गृहरचना संस्थेची जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बऱ्हाटे याच्यासह युवराज सुरेश कोतवाल (रा. लक्ष्मी रोड), विजय मांगिलाल नागोरी (वय ५५, रा. ६०१, पौर्णिमा को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी, शंकरशेठ रस्ता), सुबोध त्रिलोकचंद ओसवाल (वय ४४, रा. गुलटेकडी) आणि मॅक ड्रॉप (इंडिया) लिमिटेड कंपनीवर देखील गुन्हा दाखल आहे. आरोपींनी संगनमत करून एकता सहकारी गृहरचना संस्थेची जमीन बळकावण्याचा कट रचला. त्यासाठी संस्थचे शिक्के, लेटर हेड, प्रोसिडिंग बुक यासारखे दस्तऐवज फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट तयार करून घेतले. रवींद्र बऱ्हाटे हा संस्थेचा सचिव आणि सुधाकर खचले हा अध्यक्ष असल्याचे गाव कामगार तलाठी यांना खोटे भासवून त्याद्वारे २७/१२ उताऱ्यावर स्वतःची नावे लावून सदरची संस्थेची जागा बळकावण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद आहे. आरोपींनी संस्थेच्या कामकाजात गैरकारभार केलेले आहेत. तसेच संस्थेची नोंदणी देखील रद्द केली आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या सखोल पुढील तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी केली. न्यायालयाने त्याला २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d82459 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top