पुणे-सोलापूर एक्स्प्रेस २५ दिवसांसाठी रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे-सोलापूर एक्स्प्रेस 
२५ दिवसांसाठी रद्द
पुणे-सोलापूर एक्स्प्रेस २५ दिवसांसाठी रद्द

पुणे-सोलापूर एक्स्प्रेस २५ दिवसांसाठी रद्द

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : सोलापूर रेल्वे विभागात भिगवण-वाशिंबे या स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाकरिता २५ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेससह पुणे-सोलापूर डेमू रद्द करण्यात आली आहे. तर लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम एक्सप्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. ही रेल्वे २५ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान पुणे-मिरज-कुर्डुवाडी मार्गे धावणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

रद्द केलेली गाडी कालावधी
पुणे-सोलापूर-पुणे डेमू २४ जुलै ते १८ ऑगस्ट
पुणे-सोलापूर-पुणे एक्स्प्रेस २५ जुलै ते १८ ऑगस्ट
पुणे-भुवनेश्वर-पुणे एक्स्प्रेस २६ जुलै ते ४ ऑगस्ट
पंढरपूर-दादर एक्स्प्रेस २४ जुलै ते १ ऑगस्ट

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d82573 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..