
Maharashtra Weather : मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
पुणे : राज्यात गेल्या आठवडाभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसाचा जोर सध्या विदर्भात वाढला आहे. पुढील दोन दिवस मात्र पूर्व विदर्भात पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. रविवारी (ता. २४) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. (Maharashtra 24 July Weather Forecast)
राज्यात शनिवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. गडचिरोलीत १३० मिलिमीटर तर चंद्रपूर येथे १०० मिलिमीटर इतका पाऊस पडला. कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली होती. घाटमाथ्यावर ही तुरळक ठिकाणी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
सध्या कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेकडे सरकला आहे. ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असून कर्नाटकपासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे रविवारी (ता. २४) पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, उत्तर कोकणातील पालघरसह, नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच नागपूर, चंद्रपूर, अकोला, गडचिरोली आणि गोंदिया येथे पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
---------
रविवारी (ता. २४) पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
पालघर, नाशिक, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, अकोला, नागपूर.
-------
शनिवारी (ता. २३) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत राज्यातील पावसाची नोंद (मिलिमीटरमध्ये)ः
कोल्हापूर ः ०.२
महाबळेश्वर ः २३
नाशिक ः २
सांगली ः १
सातारा ः ०.३
मुंबई ः २
डहाणू ः २२
औरंगाबाद ः २
परभणी ः २
अकोला ः ३
नागपूर ः १७
गोंदिया ः १९
चंद्रपूर ः १५
अमरावती ः ७
बुलडाणा ः ७
वर्धा ः ६
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d82590 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..