‘पाटील यांनी कुठे दगड ठेवला माहीत नाही’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पाटील यांनी कुठे दगड ठेवला माहीत नाही’
‘पाटील यांनी कुठे दगड ठेवला माहीत नाही’

‘पाटील यांनी कुठे दगड ठेवला माहीत नाही’

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : राज्याच्या नव्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांची निवड करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी मनावर दगड ठेवला की छातीवर ठेवला, हे मला माहीत नसल्याचा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (ता. २३) पुण्यात पत्रकारांशी बोलताना पाटील यांना लगावला.

मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची निवड करताना मनावर दगड ठेऊन, त्यांचे नाव या पदासाठी जाहीर केल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शनिवारी नवी मुंबईत सुरू झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना केले होते. त्यांच्या या वक्तव्याबाबत विचारले असता, पवार यांनी हा टोला लगावला.

नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधीपासूनच झेड सुरक्षा होती, अशी माहिती मला राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून समजली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी सुरक्षा मागण्याचा आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ती देण्यास विरोध केल्याच्या वक्तव्यात फारसे तथ्य दिसत नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

इतिहासाचे अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या शिवचरित्र आणि विचारप्रवाह या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी पुण्यात पवार यांच्या हस्ते झाले. या पुस्तक प्रकाशन समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d82593 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..