
‘स्पंदन ई-बुलेटिन’चा प्रारंभ
पुणे, ता. २४ : बँक ऑफ बडोदा निवृत्त अधिकारी संघटनेच्या स्पंदन ई-बुलेटिन या द्वैमासिकाचा प्रारंभ संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जतिल पटेल (बडोदा) यांच्या हस्ते नुकताच झाला. संघटनेचे अध्यक्ष रवींद्रन यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. तर राष्ट्रीय उपसचिव व्ही. बी. चव्हाण (पुणे) यांनी द्वैमासिकाची आवश्यकता सांगितली.
यात बँकिंग, निवृत्तांचे प्रश्न याबरोबरच निवृत्तांच्या कुटुंबांचे पुढील पिढीच्या विषयांचे लेख, विविध साहित्य, काव्य आदी उपक्रमांचा अंतर्भाव असून, नातवंडांसाठी पण स्वतंत्र विभाग असल्याचे सांगितले आहे. पुणे संघटनेचे महासचिव वाय. एन. देशमुख यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची माहिती दिली. मुख्य संपादक शशांक वाघ यांनी सदस्यांच्या मागणीनुसार ई-बुलेटिनचा प्रारंभ केल्याचे सांगितले. सभासदांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
पटेल यांनी निवृत्तांच्या सुदृढ मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी संघटनेने असे विविध उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे सांगितले. याच समारंभात वयाची ७५ आणि ८५ वर्षे पूर्ण केलेल्या निवृत्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला. स्पंदनच्या संपादक मंडळाचे सदस्य गीतांजली हत्तंगडी, संजीव कुसूरकर, संजय देशपांडे, संघटनेचे पदाधिकारी तसेच निवृत्त सदस्य या प्रसंगी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d82751 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..