चहा विक्री व्यवहारातून दीड कोटीची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चहा विक्री व्यवहारातून
दीड कोटीची फसवणूक
चहा विक्री व्यवहारातून दीड कोटीची फसवणूक

चहा विक्री व्यवहारातून दीड कोटीची फसवणूक

sakal_logo
By

पुणे, ता. २४ ः चहा विक्रीशी संबंधित व्यावसायिक कंपनीच्या फ्रॅंचायजीच्या व्यवहारात तब्बल एक कोटी ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात कंपनीच्या दोन संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कंपनीचे संचालक अमित मगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
अमित गोरक्षनाथ मगर (रा. डेफोडिल्स,मगरपट्टासिटी, हडपसर), स्वप्नील बाळासाहेब तुपे (रा. निवृत्ती स्मृती, साधना हायस्कूल जवळ, माळवाडी, हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सिद्धार्थ पंढरीनाथ भाडळे (वय ३८, रा. उरुळी देवाची फाटा, हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून चोरी, अपहार, फसवणूक, बनावट कागदपत्रे बनवून त्याचा वापर यासाठी कट रचणे संगनमत करणे, धमकावणे प्रकार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एक फेब्रुवारी २०२१ ते ४ एप्रिल २०२२ दरम्यान उरुळी देवाची येथे घडला आहे.
संशयित आरोपी हे प्रेमाचा चहा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. त्यांनी कंपनीचा जीएसटी भरणा केला नसून कंपनीचा प्राप्तिकर भरलेला नाही. तसेच कंपनीच्या खात्यात जमा होणारी रक्कम स्वतःच्या खात्यामध्ये परस्पर वळती केली आहे. अनधिकृतपणे शाखांचे वाटप करून समाजमाध्यमांचा ताबा स्वतःकडे ठेवला. तसेच कंपनीचा नोंदणीकृत मोबाईल हा त्यांच्या ‘प्रेमाचा चहा फुड प्रोडक्‍टस’ या नावाने कंपनीच्या कामकाजाकरिता वापरून कंपनीचे नुकसान केले. तसेच ७ जून २०२१ रोजी कंपनीच्या फेसबुक पेजवरून फिर्यादी विक्रांत भाडळे यांना कोणतीही कल्पना न देता काढले. तसेच कंपनीचे रिटेलरबरोबर केलेले सर्व लिखित करार गहाळ झाल्याचे खोटे सांगून ‘प्रेमाचा चहा’ कंपनीच्या संचालक पदावरून मुक्त केले. त्यांच्याकडे कंपनीचा कोणताही अधिकार नसताना संशयित आरोपींनी संगनमत करून आंध्रप्रदेश, तेलंगण, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यातील शाखा चालविणाऱ्यांना अनधिकृतपणे प्रेमाचा चहा नावाने फ्रॅंचायजी वाटप करून व्यवहाराचे पैसे स्वतःच्या बॅंक खात्यावर स्वीकारले. तसेच कंपनीच्या लोगोचा वापर करून कंपनीची तब्बल १ कोटी ६७ लाखांची फसवणूक केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d82892 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..