आधार कार्ड, शिधापत्रिका वाटप शिबीराचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आधार कार्ड, शिधापत्रिका 
वाटप शिबीराचे आयोजन
आधार कार्ड, शिधापत्रिका वाटप शिबीराचे आयोजन

आधार कार्ड, शिधापत्रिका वाटप शिबीराचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आधार कार्ड आणि शिधापत्रिका वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परोपकार मित्र मंडळ, पांडव नगर चाळ वडारवाडीमध्ये हे शिबिर पार पडले. या शिबिराचे उद्‍घाटन प्राधिकरणाच्या सचिव मंगल कश्यप यांच्या हस्ते झाले.

उपजिल्हाधिकारी व आधार नोडल ऑफिसर रोहिणी आखाडे-फडतरे, अन्नधान्य वितरण अधिकारी सुरेखा माने, तहसीलदार व सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी अपर्णा तांबोळी, परिमंडळ अधिकारी ‘क’ विभाग (शिवाजीनगर) संगीता खोमणे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक मनोज जाधव, जिल्हा समन्वयक सुशील खोत, डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टचे संकेत शहा आणि माजी नगरसेवक दयानंद इरकल यावेळी उपस्थित होते. तीन दिवसीय शिबिरात नागरिकांना नवीन आधार व दुरुस्ती, नवीन राशन कार्ड काढणे, नावे कमी व जास्त करणे, अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या. शिबिराचा एकूण ८६० नागरिकांनी लाभ घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83109 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..