अवती भवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवती भवती
अवती भवती

अवती भवती

sakal_logo
By

‘मृत्यू व्यक्तीच्या नावे परवाना’
पुणे, ता. २५ ः गोवा राज्यात भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीने एक बार टाकला आहे. त्याचा परवाना मे-२०२१ मध्ये मृत व्यक्तीच्या नावे काढलेला आहे. त्यामुळे हा एकप्रकारचा गुन्हा आणि भ्रष्टाचार आहे, असा आरोप प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी यांनी केला. यासोबतच रेस्टॉरंट चालविण्याचा परवाना त्यांच्याकडे नाही. गोवा राज्याच्या कायद्यानुसार ‘एक बार-एक परवाना’ असे धोरण असताना यांच्याकडे दोन परवाने आहेत. हा सर्व प्रकार इराणी यांच्या दबावाखाली सुरू असून, त्या मंत्रिपदाचा गैरवापर करत आहेत, असाही आरोप तिवारी यांनी केला. तसेच, कुणाच्या मुलीला बदनाम करण्याचा आमचा पिंड नसल्याचे त्यांनी सांगितले.

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे, ता. २५ ः अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये ३७७ जणांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर, डॉ. प्रवीण दबडघाव, महेश करपे, विजय पानगावे, महेश लेले आदी उपस्थित होते.

स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांना साडी
पुणे, ता. २५ ः विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रभाग क्रमांक ३७ मध्ये पानमळा वसाहतीमध्ये स्वच्छ सेवा संस्थेच्या ७० महिलांना साडी, पुष्पगुच्छ आणि ५० पुरुषांना मानाचा आहेर देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते वाटप झाले. यावेळी प्रवक्ते प्रदिप देशमुख, माजी नगरसेविका प्रिया गदादे, संतोष नांगरे, विजय डाकले, विजय बगाडे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83157 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top