
जातिव्यवस्थेच्या निर्मूलनासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज’
पुणे, ता. २५ ः ‘‘देशात व राज्यात जातीजातींतील मतभेद दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. ही जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी राजकीय पक्ष, नेते, सामाजिक संघटना यांनी कोणते प्रयत्न केले?, असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी केला. जातिव्यवस्थेच्या निर्मूलनासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
प्रा. उद्धव कोळपे लिखित आणि संस्कृती प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘क्षात्रधर्म व मराठा’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार, पुणे महापालिकेचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांदे, तसेच अनिल ताडगे, दिग्विजय कोळपे-जाधव, भाऊ मडके, संतोष नानवडे, वैभव साळुंके आदी उपस्थित होते. ‘या पुस्तकापासून तरुणांना प्रेरणा मिळावी व समाज प्रबोधन व्हावे’, अशी अपेक्षा लेखक प्रा. कोळपे यांनी व्यक्त केली. जगजीवन काळे यांनी प्रास्ताविक केले. मुकुंद काकडे यांनी सूत्रसंचालन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83190 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..