जनहित संघर्ष सेनेचे धरणे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनहित संघर्ष सेनेचे धरणे आंदोलन
जनहित संघर्ष सेनेचे धरणे आंदोलन

जनहित संघर्ष सेनेचे धरणे आंदोलन

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः मातंग समाजाच्या कुटुंबावर जातीय द्वेषाने मिळकतीचा ताबा घेऊन बेघर केले, असा आरोप करत जनहित संघर्ष सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांना दिले. श्रावण विश्वनाथ जगधने यांच्या केसनंद गावातील मिळकतीवर गावातील गावगुंडांनी कब्जा करून बेघर केले आहे. त्यांना त्यांची मिळकत पुन्हा मिळवून द्यावी. तसेच त्या मिळकतीवर घर बांधून द्यावे, या मागण्या यावेळी केल्या. सेनेचे अध्यक्ष सोमनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. शंकर तडाखे, राजेंद्र शेंडगे, सुनील खंडागळे, परमेश्वर शिंदे, रणजित कांबळे, वशिष्ट आरण, नारायण गालफाडे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83219 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top