विद्यार्थ्यांच्या जिवाशी नको खेळ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांच्या जिवाशी नको खेळ!
विद्यार्थ्यांच्या जिवाशी नको खेळ!

विद्यार्थ्यांच्या जिवाशी नको खेळ!

sakal_logo
By

पुणे, ता. २६ ः शालेय विद्यार्थी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. विद्यार्थी वाहनांमध्ये दाटीवाटीने बसविणे, विरुद्ध दिशेने भरधाव वाहने चालविणे, पालकांना खोटी माहिती देऊन घाबरविणे असे प्रकार चालकांकडून केले जात आहेत. अशा प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन शाळा, पोलिस व आरटीओकडून कडक कारवाई केली जात नाही. बेशिस्त चालकांना ही जरब बसविण्याची गरज आहे, अशा पद्धतीने शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या प्रश्‍नावर नागरीकांनी व्यक्त केल्या आहे.
कोरोनाच्या दोन वर्षानंतर शहरातील शाळा सुरु झाल्या आहेत. विद्यार्थ्यांवर अवलंबून असणाऱ्या स्कूल बस, स्कूल व्हॅन, रिक्षा यांचाही व्यवसाय जोर धरु लागला आहे. मात्र विद्यार्थ्यांची असुरक्षितपणे वाहतूक केली जात असल्याची सद्यःस्थिती आहे. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये रविवारी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी वाहतुकीबाबत त्यांना येणारे अनुभव मांडत सुधारणा करण्याबाबत सूचनाही केल्या आहेत. नागरिकांचे अनुभव व सूचना पुढील प्रमाणे.

विद्यार्थी वाहतूक विषय गंभीर असला तरीही त्याला गांभीर्याने घेण्याची यंत्रणा कमी आहे. शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात झाला तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही. अर्थपूर्ण संबंधातून पळवाट काढली जाते. रिक्षामध्ये तर विद्यार्थ्यांना वाईट पद्धतीने बसविले जाते. स्कूल व्हॅनमध्ये विद्यार्थ्यांची असुरक्षितपणे वाहतूक होते.
- राजन बिचे, बिबवेवाडी

शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये दररोजच विद्यार्थी अक्षरशः दाटीवाटीने बसविले जातात. हे पालकांनाही दिसते. विद्यार्थ्यांची ने-आण नियमाप्रमाणे केल्यास वाहनाचे भाडे दुप्पट वाढेल, असे चालक सांगतात. ते पालकांना परवडणारे नाही.
- हरिश कावतकर, नारायण पेठ

आमची मुले व्हॅनमधून जातात. १६ मुले व्हॅनमध्ये बसविली जातात. चालक अरेरावी करून सांगतो शाळेने १५ मुलांची परवानगी दिली आहे. शाळा शांत बसते, कारण हा शाळेबाहेरील विषय आहे. पोलिस व आरटीओ यंत्रणांनी वेळोवेळी शाळांमध्ये जाऊन तपासणी केली पाहिजे. तरच त्यांच्यावर जरब बसेल.
- आशिष चंदनशिवे

मी सणसवाडी येथे खासगी कंपनीत नोकरी करतो. दररोज सकाळी नोकरीवर जात असताना स्कूल बस धोकादायक पद्धतीने विद्यार्थी वाहतूक करतात. अनेकदा विरुद्ध दिशेने भरधाव वेगात जाताना आपल्याच मनात धडकी भरते. थोडा वेळ वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे. वाघोली ते लोणीकंद पेरणे फाटा या दरम्यान हे प्रमाण खूप आहे. संबंधित चालकांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात मोठा अपघात घडू शकतो.
- बाळकृष्ण गायकवाड, सणसवाडी

शालेय विद्यार्थी वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून हा व्यवसाय केला जात आहे. योग्य परमीट नसणे, बस, व्हॅनमध्ये मुले दाटीवाटीने बसविणे, गाड्या वेगात आणि विरुद्ध दिशेने चालविणे, नऊ महिने सेवा देऊन वर्षभराचे भाडे वसूल करणे या सगळ्या अयोग्य गोष्टी सुरु आहेत.
- राजीव प्रधान

जे विद्यार्थी लांब राहतात. त्यांची ये-जा करण्याची व्यवस्था शाळांनी करावी. रिक्षामध्ये एकावेळी फक्त तीन-चारच विद्यार्थी बसविण्याची सक्ती करावी. लैंगिक शोषणाच्या तक्रारी आल्यास संबंधित वाहन चालकाचा परवाना तत्काळ रद्द करण्यात यावा.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83235 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top