अवैध सावकारांविरोधात गुन्हे दाखल करावेत ः जिल्हाधिकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवैध सावकारांविरोधात गुन्हे 
दाखल करावेत ः जिल्हाधिकारी
अवैध सावकारांविरोधात गुन्हे दाखल करावेत ः जिल्हाधिकारी

अवैध सावकारांविरोधात गुन्हे दाखल करावेत ः जिल्हाधिकारी

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : ‘‘अवैध सावकारी रोखण्यासाठी सहकार विभागाने पोलिसांची मदत घेऊन गुन्हे दाखल करावेत. सहकार निबंधकांनी अधिक तपासणी करून योग्य पद्धतीने गुन्हे दाखल होतील याकडे लक्ष द्यावे,’’ असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमाबाबत समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.२५) झाली. शहर जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, पिंपरी-चिंचवडचे सहायक आयुक्त पद्माकर घनवट, पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक बाळासाहेब तावरे यांच्यासह इतर उपनिबंधक उपस्थित होते.

खरेदीखत रद्द करण्याचे अधिकार
डॉ. देशमुख म्हणाले, अवैध सावकारीविरोधात तक्रारी करण्याच्या अनुषंगाने पीडित नागरिकांनी पुढे येण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. तक्रारदारांमध्ये विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. सहकार विभागाला कायद्यान्वये व्यापक अधिकार असून, व्याजाच्या पैशाच्या बदल्यात केलेली खरेदीखते रद्द करण्याचे अधिकार सहकार विभागाला आहेत. त्याचा उपयोग सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी करावा.’’
आघाव म्हणाले, ‘‘अवैध सावकारी रोखण्यासाठी सर्व तालुक्यांत स्थायी भरारी पथके नेमली आहेत. पोलिस, सहकार विभाग आणि महसूल विभागाच्या समन्वयाने काम सुरू आहे. हा आता दखलपात्र गुन्हा केला आहे.’’

पुणे जिल्ह्यातील स्थिती :
परवानाधारक खासगी सावकार १ हजार ४५६
परवाना नूतनीकरण ४०४
परवाना नूतनीकरण प्रलंबित ९८२

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83271 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..