ग्राहकांची नाराजी, हॉटेल व्यवसायिकांना दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्राहकांची नाराजी, हॉटेल व्यवसायिकांना दिलासा
ग्राहकांची नाराजी, हॉटेल व्यवसायिकांना दिलासा

ग्राहकांची नाराजी, हॉटेल व्यवसायिकांना दिलासा

sakal_logo
By

पुणे, ता. २६ : देशातील सर्व हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थांच्या बिलांवर सेवा शुल्क (सर्व्हिस चार्ज) आकारण्यास मनाई करणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांना दिल्ली उच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर असून हॉटेल व्यवसायिकांना मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे.
सेवा शुल्काबाबत ग्राहकांच्या तक्रारी असल्याने व त्याची मनमानी पद्धतीने वसुली केली जात असल्याने केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थांच्या बिलात सेवा शुल्क लावू नये, असे स्पष्ट केले. मात्र, प्राधिकरणाच्या सूचनांना केराची टोपली दाखवत अनेक हॉटेलांमध्ये सेवा शुल्काची आकारणी केली जात होती. दरम्यान, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) आणि फेडरेशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने या मार्गदर्शक तत्त्वांना न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर न्यायालयाने प्राधिकरणाला उत्तर दाखल करण्याचे आदेश देऊन या मार्गदर्शक तत्त्वांना २५ नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे.

कर्मचाऱ्यांना सेवा शुल्क मिळते का?
गेल्या काही दिवसांत हॉटेलांमधील खाद्यपदार्थांचे दर वाढले आहेत. वाढलेली महागार्इ हे त्यामागील कारण असून शकते. आता जर सेवा शुल्कांमुळे हॉटेलात जाणे आणखी महागणार असेल तर याचा गांभीर्याने विचार करावा. तसेच, वसूल केलेले सेवा शुल्क कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचत आहे का? याची देखील तपासणी होणे गरजेचे आहे, असे मत नोकरदार तुषार राऊत यांनी व्यक्त केले.

सेवा शुल्क न आकारण्याच्या स्थगितीमुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना आता पुढील निर्णयापर्यंत पूर्वीप्रमाणे बिलात सेवाशुल्क आकारता येणार आहे. त्याचे प्रमाण पाच ते दहा टक्क्यांच्या दरम्यान असते. ही रक्कम हॉटेलांमधील कामगारांना दिली जाते. त्यामुळे ग्राहकांना अधिक चांगली सेवा मिळण्यास नक्कीच मदत होते.
- गणेश शेट्टी,
अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशन


सध्या सर्रास सर्वच हॉटेल- रेस्टॉरंटमध्ये सेवा शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे हे शुल्क आकारत असलेल्या हॉटेलत जायचे की नाही, याचा निर्णय ग्राहकांनी घ्यावा. मात्र, ज्या ठिकाणी हे शुल्क घेतले जाते, तेथे त्या रकमेचा वापर हा हॉटेल कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वापरले जाते. हे शुल्क आकारणे बंद झाल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. शुल्क आकारण्याच्या बंदीला स्थगिती मिळाल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
- शरण शेट्टी, अध्यक्ष, पुणे हॉटेलियर्स असोसिएशन

राज्य आणि केंद्र सरकारच्या करामुळे हॉटेलच्या बिलाची रक्कम आधीच वाढलेली असते. त्यात पाच ते दहा टक्के सेवा शुल्काची भर पडली तर हॉटेलात जाणे आणखी महागेल. त्यामुळे हे शुल्क आकारण्यात येऊच नये. स्थगितीचा निर्णय होर्इपर्यंत अनेक हॉटेलांत शुल्क आकारले जात होते. त्यांच्यावर योग्य ती कारवार्इ होणे गरजेचे आहे.
- प्राजक्ता मोरे, विद्यार्थिनी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83439 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..