
वन्यजीव जनजागृती कार्यशाळेची सुरुवात
पुणे, ता. २६ : दिवसेंदिवस वाढत असलेल्या मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी तसेच, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांविषयी जनजागृती करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात वन्यजीव जनजागृती कार्यशाळा या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. पुणे वन विभाग आणि रेस्क्यू ट्रस्टच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या माध्यमातून १५ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत वनक्षेत्र इंदापूर, पौड, वडगाव मावळ, शिरोता, पुणे, भांबुर्डा अंतर्गत असलेल्या शाळा, महाविद्यालये, स्थानिक समुदाय तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. याची सुरवात पुणे वन विभागांतर्गत असलेल्या दौंड वनपरिक्षेत्रापासून करण्यात आली आहे. एका आठवड्याच्या कालावधीत एकूण १८४० जणांनी यात सहभाग घेतला. नाग, घोणस, मण्यार यांसारख्या विषारी सापांची माहिती चित्रफितीद्वारे देण्यात आली. तसेच बिबट प्रवण क्षेत्रात नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83572 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..