वाचन प्रेरणा उपक्रमाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाचन प्रेरणा उपक्रमाचे आयोजन
वाचन प्रेरणा उपक्रमाचे आयोजन

वाचन प्रेरणा उपक्रमाचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. २६ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त समाजकल्याण विभागाच्या वतीने राज्यभरात वाचन प्रेरणा उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या संदर्भात समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी विभागातील सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

छत्रपती शाहू महाराजांनी समाजाच्या उन्नतीसाठी परिश्रम घेतले. तसेच, दुर्बल घटकांना प्रगतिपथावर आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. शाहू महाराज यांचे हे स्मृती शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यानिमित्त राज्यात जुलै ते नोव्हेंबर २०२२ या पाच महिन्यांच्या कालावधीत सर्व शासकीय निवासी शाळा, वसतिगृहे, समाजमंदिरे या ठिकाणी वाचन प्रेरणा उपक्रम आणि वाचन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात दोन हजार ३८८ अनुदानित वसतिगृहे, ४४१ शासकीय वसतिगृहे, १६५ अनुसूचित जातीच्या आश्रमशाळा आणि ९० शासकीय निवासी शाळा आहेत. तसेच, ६७ हजार ६१८ अनुसूचित जाती लोकवस्त्या आहेत. या ठिकाणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समाजकल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83574 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top